ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्र

जुनी केस मागे न घेतल्याच्या कारणावरून पिस्तुलातून गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

रेकॉर्डवरील गुन्हेगारांना खडकी पोलिसांनी केली अटक

Spread the love

पुणे : जुनी केस मागे न घेतल्याच्या कारणावरून दोघा रेकॉर्डवरील गुंडांनी दोघा तरुणांना मारहाण करून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रकार समोर आला आहे. खडकी पोलिसांनी या गुन्हेगारांना अटक केली आहे.

सुदर्शन अरविंद आडसुळ Surdashan Arvind Aadsul (वय २०, रा. जुनी तालीम जवळ, गवळीवाडा, खडकी), चिन्मय कैलास मोगल Chinmay Kailash Mogul (वय २३, रा. मॅक्सकेरी हॉस्पिटल, इंडियन पेट्रोल पंप, कासारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत आकाश संजय वाघमारे (वय २४, रा. महादेववाडी, खडकी) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना खडकी येथील राजीव गांधी नगर, बुद्ध विहारजवळील रेल्वे मार्गाजवळ १५ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. फिर्यादी यांचे आरोपींबरोबर या पूर्वी भांडणे झाले होती. त्याची त्यांनी केस दाखल केली होती. ही केस मागे न घेतल्याने त्याचा या दोघांना राग होता. फिर्यादी व त्यांचे मित्र हे मोटारसायकलवरून राजीव गांधी नगर येथे आले. तेव्हा चिन्मय हा ओरडत आला. हेच ते चांडणे गँगचे मेंबर आहेत. बघता काय सुद्धा घाल गोळ्या, असे ओरडला. त्यावर सुदर्शन याने चिन्मय यांच्या कमरेचे पिस्तुल काढून हे केस मागे घेत नाही का, तुमच्या ** गोळ्या घालतो, असे म्हणून फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या दिशेने गोळीबार केला. परंतु, त्यांना नेम चुकला. त्यानंतर पिस्तुल हवेत दाखवत “आज नाही तो कल, सबका हिसाब होगा, भाई वापस आएगा” असे म्हणुन धमकी देऊन दहशत पसरवून ते निघून गेले.

या घटनेची माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल दखवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम, पोलिस निरीक्षक किरण गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चोगले, फिरोज खान यांनी घटनास्थळी भेट दिली. खडकी पोलिसांनी दोघा रेकॉर्डवरील गुंडांना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!