धर्मब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

 श्री सद्गुरू जंगली महाराज समाधीस चंदन उटी

Spread the love

पुणे . ४ एप्रिल १८९० साली श्री सद्गुरू जंगली महाराज यांनी समाधी घेतली त्यांच्या नंतर श्री महाराजाच्या पट्टशिष्या निजानंद स्वरूपी रखमाबाई उर्फ आईसाहेब गाडगीळ यांनी श्री महाराजांच्या समाधीची दैनंदिन व सणवार आणि वार्षिक होणाऱ्या पुजा अर्चा उत्सव इत्यादींच्या सर्व व्यवस्था नेमून दिल्या.चैत्र वैशाख मासात प्रखर उन्हाळ्यामुळे गरमाईचा त्रास कमी होण्यासाठी देव देवतांच्या – सत्पुरुषांच्या समाधींना चंदनाचा लेप लावला जातो. तसाच चंदनाचा लेप अर्थात चंदनाची उटी श्री महाराजांच्या पुण्यतिथी नंतर येणाऱ्या गुरुवारी लावण्याची चंदन उटी पूजा ही महाराजांच्या पट्टशिष्या निजानंद स्वरूपी रखमाबाई आईसाहेब गाडगीळ यांनी श्री महाराज यांचे शिष्य त्रिंबकजी सुलतानजी शिरोळे(इनामदार) यांना करण्याची आज्ञा दिली. तेव्हापासून ही चंदन उटी पूजा आज पर्यंत श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ करत आहे. जंगली महाराज भजनी मंडळ हे महाराजांनी स्वतः स्थापन केलेले भजनी मंडळ आहे. आज रोजी महाराजाची चंदन उटी पार पडली. यावेळी सर्व मंदिराला फुलांनी सजविण्यात आले. तसेच महाराज हे दत्त परंपरेतील असल्यामुळे त्यांच्या समाधीवर श्री गुरुदेव दत्त महाराजांचा मुखवटा ठेवण्यात आला होता. बाजूनी मोगरा फुलांची आरास करण्यात आली. उटी लेपण केल्या नंतर महाराजांनी स्थापन केलेल्या भजनी मंडळाकडून भजन सेवा होते. चंदन उटीचे सर्व आयोजन हे सद्गुरू भजनी मंडळाकडून करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button