आलंदीजीवन शैलीब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

मोशी उपअग्निशमन केंद्रात अत्याधुनिक वाहन दाखल

Spread the love

आळंदी .पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात नवी इसुझू (scap2wd) वाहन दाखल झाले आहे. अलीकडे शहरात आगीचे घटनांत वाढ झाल्याने या वाहनाचे दाखल होण्याने शहर आणि नागरिक, मालमत्ता यांची सुरक्षितता जतन करण्यास सक्षम होत असलेले उपअग्निशमन केंद्रात वाहन दाखल झाल्याने अग्निशमन विभागास बळ मिळले आहे. यंत्रणा अधिक सक्षम झाल्यास सेवा अधिक प्रभावी मिळून आगीचे घटनांवर तात्काळ नियंत्रण मिळणार आहे.

  पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोशी उपअग्निशमन केंद्रात आगीच्या घटना रोखण्यासाठी तसेच तात्काळ नियंत्रणास दक्षता घेत विभागाचे ताफ्यात नवीन अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे. यामुळे सेवा देणे प्रभावी होणार आहे. मोशी उपअग्निशमन केंद्रात या वाहनांमुळे अग्निशमन वाहनांच्या ताफ्यात वाढ झाली. अग्निशमन विभागातील कर्मचारी, साहित्य तात्काळ घटना स्थळी मदत कार्यास सोयीस्कर होणार आहे.

  येत्या पावसाळ्यात देखील आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यास उपयुक्त ठरणार आहे. जीवरक्षक बोटी, पंप, आदी बचाव साहित्य घटनास्थळी पोच होण्यास मदतीचे होईल. पिंपरी चिंचवड मुख्य अग्निशामक केंद्र भोसरी, प्राधिकरण, थेरगाव, मोशी, चिखली, तळवडे आदी उपअग्निशमन विभाग कार्यरत आहेत. यामुळे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड मधील आगीच्या घटनावर नियंत्रणास मदत होणार आहे. नियंत्रणात आणण्यास या अत्याधुनिक वाहनांचा फायदा होणार आहे.

  मोशी उपअग्निशमन केंद्रात आधुनिक पद्धतीचे वाहन आल्याने शहरास निश्चितच उपयुक्त राहील. सर्वसामान्य जनतेला होणार आहे. शहरात आग नियंत्रणास यंत्रणा साहित्य तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन मदत कार्य होईल. कर्मचाऱ्यांना घटना स्थळी जाण्यास तसेच मदतीने आग लवकर आटोक्यात आणण्यास या लहान आकाराच्या गाड्यांचा उपयोग होणार असल्याचे मोशी उपअग्निशमन अधिकारी विनायक नाळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button