पहिला ‘राम नदी सेवक‘ सन्मान डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांना जाहीर
पाचवा ऑनलाईन ‘किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सव‘ २४ ते २६ मार्च ला

महोत्सवात विनामूल्य प्रवेश
आळंदी . राम नदीशी नाते निर्माण व्हावे, तीच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हावा, तीची स्वच्छता राखण्यासाठी तरुण पिढी प्रेरीत व्हावी. यासाठी महोत्सव महत्वाचे आहेत. यावर आमचा ठाम विश्वास आहे. ‘राम नदी पुनरूज्जीवन अभिमान’ ला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली,याचे औचित्य साधून पाचवा ऑनलाईन ‘किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सव‘ दि. २४, २५, २६ मार्च २०२५ या कालावधीत प्रक्षेपित करण्यात येणार असल्याची माहिती किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.
सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या १९ .२ किमी. लांबीच्या राम नदीचा प्रवाह पूर्वी प्रमाणे जास्तीत जास्त शुध्द व्हावा आणि ती अविरल व निर्मळ व्हावी या उद्देश्याने काम सुरु आहे. नद्या शांतताप्रिय आणि आनंदी समाज घडविण्यासाठी मदत करतील तसेच भावी पिढ्यांसाठी समृध्द निसर्ग निर्माण करतील. या मुळे नदीच्या पुनरूज्जीवनासाठी एक सर्व समावेशक व शाश्वत प्रारूप तयार करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा महोत्सव होत आहे.
ऑनलाईन राम नदी महोत्सवाचे उद्घाटन पर्यावरण तज्ज्ञ व सोलापूर चे राम नदी अभ्यासक, डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांच्या भाषणाने सोमवारी ( दि. २४ ) सकाळी ११ वाजता होणार आहे.
महोत्सवाचा समारोप २६ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळात होणार आहे. या समारंभात डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांना ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, लेखक, अभ्यासू विचारवंत डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते पहिला राम नदी सेवक सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या प्रसंगी वसुंधरा महोत्सवाचे अध्यक्ष आर. आर. देशपांडे, फॅसिलिटेटर आनंद चितळे, किर्लोस्कर वसुंधराचे क्युरेटर डॉ. गुरुदास नूलकर उपस्थित राहणार आहेत.
राम नदी विषयक कल्पक उपक्रम, कार्यशाळा व निसर्ग परिक्रमांवर आधारित चित्रपटांचा देखील समावेश या महोत्सवात करण्यात आला आहे. यात राम नदीची ओळख, सफर पाषाण येथील सोमेश्वर मंदिराची, राम नदीचे भूजल व्यवस्थापन चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. महोत्सवाचे नॉलेज पार्टनर डि.डब्ल्मु. इको इंडिया, स्क्रोल.इन, मोंगाबे आणि डाउन टू अर्थ आहेत.
महोत्सवातील सहभागी तज्ज्ञ यामध्ये श्रीनिवास बडगबाळकर, विजय परांजपे, अडव्होकेट अनिल कोकाटे, परीनिता दांडेकर, सुरभी केसरवानी (गुरुजाई हरियाणा), विकास चौहान, प्राची क्षिरसागर, अश्विनी कुलकण, डॉ. संजय खावट, चिनानाप्पा (केरला), कविता आणि वेणूगोपाळ, श्री. पद्रे (पत्रकारा के.एल.), निव्या जोर्ज, मनिष दिडमिशे, रोटरी ३१३१ टिम, राहूल मराठे, सिमा काफिल (लिटरबॉम कलेक्टर अफ्रिका), कॅमेरोन सर्व्हिस (सी.इ.ओ. द लिटरबॉम प्रोजेक्ट साऊथ अफ्रिका), जिम पलाड (कॉन्झर्वेशन सामन्स), श्रीधाम बिस्वास, देबाजित दत्ता, सबर्ना सरस्वती, अनिता कुंडु, डॉ. राजेंद्र सिंह, राजेश पंडित, धनंजय बेळे, डॉ. धनश्री हरदास, शगुन कपिल, उम्रा अनिस, फराज अहमद, सुनिता नरेन, राजीव कुमार मित्तल, के. अशोक नटराजन, विवेक घोडमारे, डॉ. अर्पित सिंग, के जे श्रीराम, ताज अलाम, सालेम अकमल, मोहम्मद नाझिर हुसेन, विकी कश्यप, लालमणी यादव, मनिष मिश्रा आदी पर्यावरण विशेषज्ञांचा सहभाग या महोत्सवात आहे.
या महोत्सवात पुढील विषयांचा अंतर्भाव राहणार आहे. यात जिऑलोजी ऑफ राम नदी, ग्राउंडवॉटर, स्प्रिंग्ज्, वॉटर कॉन्झरर्वेशन, पाँड इकोसिस्टिम, फामटोरेमिडिएशन, इकॉलोजिकल रेस्टोरेशन, सुएज ट्रिटमेंट प्लांट, रीड बेड, कॅट्स ऑफ केरला, ट्रेडीशनल वॉटर कॉन्सरर्वेशन स्ट्रक्चर, चेक डॅम्स, इको रेस्टोरेशन, डिसिल्टेशन ऑफ लेक, बटरफ्लाय गार्डन, बायोडायर्व्हेसिटी, नेटिव्ह ट्रीज, राम नदी परिक्रमा, लिटरबॉम, प्लॅस्टिक कलेक्शन, ग्लोबल प्लॅस्टिक ट्रीटी, डिक्लाइन इन फिश व्हरायटी, राम नदी स्कूल प्रोग्राम, नाशिक कुंभ, ग्रीन कुंभ, वेस्टवॉटर ट्रीटमेंट, सस्टेनेबल टनारीज, ग्रीन बिझनेसेस, राम नदी रेस्टोरेशन इत्यादी विषयांचा महोत्सवामध्ये परामर्ष घेतला जात आहे.
महोत्सवाचे दृक-श्राव्य संकलन तुषार सरोदे, समन्वय सुवर्णा भांबुरकर, निवेदन शताक्षी गावडे आणि ऑफिस व्यवस्थापन अर्जुन नाटेकर यांनी केले आहे. या महोत्सवाची वैशिष्ट्ये यामध्ये दिनांक सोमवार ( दि. २४ ) ते बुधवार ( दि. २६ ) असा तीन दिवशीय महोत्सव असून यात रोज एक तासाचे चे प्रक्षेपण केले जाणार आहे. रोजचे प्रक्षेपण वेळेत सकाळी ११ ते दु. १२ आणि पुन:प्रक्षेपण : सायंकाळी ७ ते रात्री ८ होणार आहे. महोत्सव विनामूल्य असून किर्लोस्कर वसुंधराच्या फेसबुक पेजवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. महोत्सव पहाण्यासाठी : ‘like’ Facebook page of ‘Kirloskar Vasundhara’ आवाहन करण्यात आले आहे.