ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

भाजप शहराध्यक्षांकडून पुण्यात झुंडशाही-गुंडशाही-बुलडोझरशाही

“अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989” अंतर्गत भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे व इतर १८ जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

Spread the love

पुणे:- देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये अल्पसंख्यांक समुदाय विरोधात आत्तापर्यंत देशाने भाजपची बुलडोझर शाही पाहिली. मात्र आता पुण्यामध्ये विरोधकांवरती ही भाजप बुलडोजर चालवू पाहतोय. असा आरोप चैत्राली धाडवे-क्षीरसागर यांनी  आज पत्रकार परिषदेत केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेला चैत्राली धाडवे-क्षीरसागर यांच्यासह अॅड. आकाश साबळे, सागर धाडवे, सरचिटणीस युवक काँग्रेस पुणे शहर आदि उपस्थित होते .

पुणे शहरात मागील ४ महिन्यांपासून भाजप शहराध्यक्ष, मा सभागृह नेते पुणे महापालिका धीरज घाटे यांच्या सानेगुरुजी नगर येथील कार्यालय” व्यायामशाळा, तसेच नवी पेठ व लोकमान्य नगर येथील व्यायामशाळा भ्रष्टाचार आणि नंतर वीजचोरी च्या बातम्या येत आहेत. सानेगुरुजी नगर मधील घाटे यांच्या कार्यालयात महावितरण कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली पण ती फक्त दिखाव्या पुरती त्याविरोधात प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी तशी नोटीस बजावली आहे आणि युवक कॉंग्रेस तर्फे या विरोधात आंदोलन करण्यात आले. हा राग मनात धरून युवक काँग्रेस चे सरचिटणीस सागर धाडवे यांच्यावर घाटे समर्थक काही मुलांकडून सातत्याने हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले घराबाहेर टोळक्याने मुले उभी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्याची तक्रार पर्वती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली ही होती झुंड शाही.
त्यानंतर रेकॉर्ड वरील गुन्हेगार असलेल्या नवी पेठेतील गणेश बोत्रे याच्या मार्फत प्रत्यक्षात , फोनवरून धमकाविण्यात आले, त्यापुढे जाऊन ह्याच बोत्रे यांने फेसबुक वर ठेचून काढण्याची धमकी देत पोस्ट केली त्यांची तक्रार डी सी पी यांना देण्यात आली तरी सदर बोत्रे हा सागर धाडवे यांच्या सोसायटी खाली येऊन संशयित रित्या थांबल्याचे निदर्शनास आले ही झाली गुंडशाही.
त्यापुढे जाऊन सागर धाडवे ह्यांनी युवक काँग्रेस च्या वतीने महावितरण च्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले हा राग मनात धरून धीरज घाटे यांच्या सानेगुरुजी नगर मधील १८ समर्थकांनी एकाच वेळी, एकाच ड्राफ्ट वर, नावे आणि पत्ता बदलून सागर धाडवे यांच्या वडिलोपार्जित असलेल्या सुखसागर नगर येथील घर पाडण्यासाठी तक्रारी अर्ज दाखल केले आणि पुणे मनपा बांधकाम विभाग प्रशासनाने ही भाजप च्या राजकीय दबावापोटी तत्पर २ तासात सुखसागर नगर येथील घरी जाऊन नोटिस बजावली ही झाली विरोधकांना दाबण्यासाठी बुलडोझर शाही..
ह्यावर हे थांबतील तर खरे घर पाडण्यासाठी अर्ज दिल्यानंतर १८ अर्जदारांपैकी काहींनी धीरज घाटे यांचा बंदूक रोखून धरलेला फोटो ठेऊन धमकी वजा गाणी लावून व्हॉट्सअप, फेसबुक ला स्टेटस ठेवले ही झाली पुन्हा गुंडशाही..
अशाप्रकारे झुंडशाही, गुंडशाही आणि त्यातून ही थांबत नाही म्हणून बुलडोझर शाही असा प्रकार पुणे शहरात सुरू आहे आणि पुणे महानगर पालिका, महावितरण आणि पुणे पोलिस हे राजकीय दबावाखाली धीरज घाटे, मनीषा घाटे आणि समर्थकांना वाचवीत आहेत.
कारण सदर विषयात चैत्राली सागर धाडवे-क्षीरसागर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जाऊन भाजप शराध्यक्ष धीरज घाटे व इतर १८ जणांच्या विरोधात जातीय आकसा पोटी घर पाडण्याची तक्रार देणाऱ्यांच्या विरोधात “अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989” नुसार तक्रार दाखल केली आहे, पण अजूनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक खिलारे यांनी साधी एकाची चौकशी केली नसल्याचे समजते यासाठी ए सी पी साहेबांची भेट घेतली असता त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक खिलारे यांना फोन करून चौकशीचे आदेश दिले तरही खिलारे साहेबांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
यावेळी बोलताना चैत्राली धाडवे-क्षीरसागर म्हणाल्या
सदर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा व्यायमशाळा भ्रष्टाचार, वीजचोरी माझे पती सागर धाडवे यांनी बाहेर काढल्याचा राग मनात धरून घाटे यांनी माझ्या पतीच्या व्यवसायावर घाला घालण्याचा प्रयत्न केला, तसेच आता तर माझ्या घर पाडण्यासाठी घाटे समर्थक १८ कार्यकर्त्यांनी एकावेळी, एकाच ड्राफ्ट वर, फक्त नावे बदलून पुणे महापालिका बांधकाम विभागाकडे तक्रार केली , सुखसागर येथील घर हे आमची वडिलोपार्जित मालमत्ता असून तेथील सर्व बांधकामे एकसारखी असून फक्त त्यांनी मुद्दाम मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या पतीला नाहक त्रास देण्यासाठी आमच्याच घराची तक्रार दिली आहे आणि जातीय द्वेषातून हा प्रकार केला आहे. मी घरातील मोठी सून असून घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे हे संबंधितांना माहिती आहे. तसेच माझा आणि माझ्या पतीचा आंतरजातीय विवाह झाला आहे आणि हे अनेकांना रुचलेले नाही आणि हा प्रकार अनेक वर्ष शांतपणे चालू होता पण आज त्यांची ताकद वाढली आहे कारण त्यांच्यासोबत सत्ता आहे, पोलिस प्रशासन, गृहमंत्री, मुख्यमंत्री आहेत.
पण आम्ही हा लढा सुरूच ठेऊ माझ्या घरावर आलेल्या सर्वांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या मार्गाने लढून उत्तर देऊ असे त्या म्हणाल्या.

ऍड. आकाश साबळे म्हणाले, एखाद्या व्यक्तीने राजकीय हेतूने प्रेरित होऊन आपल्या विरोधी माणसाला टार्गेट करणे अयोग्य आहे. सागर धाडावें यांनी सामजिक जबाबदारी म्हणून जे प्रकरण उघडकीस आणले, त्याचा सूड म्हणून त्यांना भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांच्या कुटुंबाला टार्गेट केले आहे, त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची धमकी देतात, एकच वेळी 18 कार्यकर्ते त्यांच्या घरावर कारवाई करण्याची मागणी करतात आणि अधिकारीदोन तासात कारवाई करण्याचा निर्णय घेतला ही कृती संशयास्पद आणि संविधान विरोधी आहे, चैत्राली धाडवे-क्षीरसागर या अनुसूचित जातीच्या असल्याचे त्यांना माहित असल्याने या कुटुंबाला टार्गेट करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!