पीडीएफए महिला लीग’ २०२४-२५ फुटबॉल स्पर्धा
इग्नाईट एफसी, अॅस्पायर एफसी, डेक्कन इलेव्हन संघांची विजयी कामगिरी

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडानगरी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सानिका देशपांडे हिने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर डेक्कन इलेव्हन संघाने उत्कर्ष क्रीडा मंच कोथरूड एफसी संघाचा १-० असा पराभव केला. अॅस्पायर फुटबॉल क्लब संघाने बिटा स्पोटर्स अॅकॅडमी संघाचा ९-० असा सहज धुव्वा उडविला. सामन्यामध्ये पुजा गुप्ता हिने पाच गोल नोंदविले. याशिवाय आकृती गुप्ता आणि अरमीत कौर या दोघींनी दोन-दोन गोल नोंदवून संघाला सहज विजय मिळवून दिला. इग्नाईट एफसी संघाने स्निग्मय एफसी संघाचा ८-० असा सहज पराभव करून आगेकूच केली. श्रेया कुप हिने सर्वाधिक चार गोलांची नोंद केली. प्रतिक्क्षा देवांग, देवश्री भक्ता, तिहा परेरा आणि दिव्या खटाल यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
१) डेक्कन इलेव्हनः १ (सानिका देशपांडे २० मि.) वि.वि. उत्कर्ष क्रीडा मंच कोथरूड एफसीः ०; सर्वोत्कृष्ठ खेळाडूः सानिका देशपांडे;
२) अॅस्पायर फुटबॉल क्लबः ९ (पुजा गुप्ता १०, १२, १९, ८४, ८९ मि., आकृती गुप्ता ५३, ९० मि., अरमीत कौर ६३, ७४ मि.) वि.वि. बिटा स्पोटर्स अॅकॅडमीः ०; सर्वोत्कृष्ठ खेळाडूः गार्गी बिलगीकर;
३) इग्नाईट एफसीः ८ (श्रेया कुप २, १०, १९, ७४ मि., प्रतिक्क्षा देवांग ६१ मि., देवश्री भक्ता ४८ मि., तिहा परेरा ७० मि., दिव्या खटाल ६९ मि.) वि.वि. स्निग्मय एफसीः ०; सर्वोत्कृष्ठ खेळाडूः अर्चिता सिंग;