श्रीक्षेत्र मरकळ भागवताचार्य भक्ती दीदी पांचाळ शिवपुराण कथा श्रवण पर्वणी
पंचलिंग गुरुदेव दत्त संस्थान ताई माऊली यांचे भाविकांना आवाहन

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्रीक्षेत्र मरकळ ( ता. खेड ) येथील पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थान मध्ये श्रावण मासानिमित्त “सत्य दिव्य शिवपुराण कथा” महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ( दि. ९ ) १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत दररोज संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत भागवताचार्य कथाकार भक्ती दीदी पांचाळ यांचे सुश्राव्य हृदयस्पर्शी वाणीतून शिवपुराण कथा श्रवणाची पर्वणी शिवभक्तांसाठी अध्यात्मिक मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. भाविक, नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री पंचलिंग गुरुदेव दत्त संस्थान अध्यक्षा ताई माऊली महाराज यांनी केले आहे.
कथा प्रारंभ दिनी श्रींचे मूर्तीचे पूजन, दिपप्रज्वलन मंगलमय वातावरणात कथेची सुरुवात भक्ती दीदी यांनी हरिनाम गजरात, शिवभक्तीमय उत्साहात केली. प्रारंभ दिनी मठाचे अध्यक्षा ताई माऊली महाराज, ज्येष्ठ नागरिक माजी चेअरमन बाजीराव ज्ञानोबा लोखंडे, आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त अर्जुन मेदनकर, सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी राजेंद्र जाधव, सोमनाथ काळे, शिवसेना आळंदी शहर प्रमुख माऊली घुऺडरे, हनुमंत आव्हाळे, ह.भ.प. वाबळे महाराज, संयोजक रोहिदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
या पवित्र शिवपुराण कथेचा सांगता सोहळा १६ ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन, महाप्रसादाने होणार आहे. यास पंचक्रोशीतील नागरिक, भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ताई माऊली महाराज यांनी केले आहे. कथावाचनाची सेवा प्रसिद्ध कथाकार भागवताचार्य भक्ती दीदी पांचाळ ( आळंदी देवाची ) रुजू करीत असून त्यांना सिंथ वादक प्रतिक महाराज पांचाळ, तबला वादक राजू महाराज शिंदे, ऑर्गन वादक प्रमेश महाराज बनसोडे बनसोडे आणि गायक सुरेश महाराज पांचाळ साथ देत आहेत. संगीतमय शिवपुराण कथा श्रवणाची श्रावणातील पर्वणी सर्वानी साधावी असे भक्ती दीदी महाराज यांनी सांगितले. “हर… हर… महादेव” या घोषणांनी शिवपुराण कथा सुरु करण्यात आली आहे. सर्वांनी कथेचे श्रवणाचा आणि अध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे दत्तभक्त ताई माऊली महाराज यांनी शिवभक्त, भाविक, ग्रामस्थ यांना आवाहन केले आहे.