खेलपुणेमराठी

‘द क्यु कल्चर करंडक’ खुली ९-बॉल पुल अजिंक्यपद स्पर्धा !!

शिवम अरोरा याला विजेतेपद !!

Spread the love
पुणे. पुणे जिल्हा बिलीयडर्स आणि स्नुकर संघटना (पीडीबीएसए) यांच्या मान्येतेखाली आणि क्यु कल्चर क्लब आणि अ‍ॅपेक्स् स्पोटर्स तर्फे आयोजित ‘द क्यु कल्चर करंडक’ खुली ९-बॉल पुल अजिंक्यपद स्पर्धेत शिवम अरोरा याने तन्मय जातकर याचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
वानवडी येथील द क्यु कल्चर क्लब येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये अमानोरा क्लबच्या शिवम अरोरा याने बे्रक द स्नुकरच्या तन्मय जातकर याचा १०-७ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद मिळवले. याआधी झालेल्या उपांत्य फेरीमध्ये शिवम अरोरा याने अभिजीत रानाडे याची घौडदौड थांबविताना ९-६ असा विजय मिळवला. तन्मय जातकर याने धवल गढवी याचा ९-६ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र बिलीयडर्स आणि स्नुकर संघटनेचे अध्यक्ष आणि मनिषा कन्स्ट्रक्शन्स्चे संचालक राजन खिंवसरा, पुणे जिल्हा बिलीयडर्स आणि स्नुकर संघटनचे अध्यक्ष कर्नल एडमंड सँचेस, पीडीबीएसएचे सचिव सिद्धांत फाटे, अपेक्स् स्पोटर्स प्रमोशनचे मोहसिन अच्चावा आणि टेल्सा कॉर्पोरेशनचे रोहन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना करंडक देण्यात आला.

स्पर्धेचा निकालः मुख्य ड्रॉः उपांत्य फेरीः
शिवम अरोरा (अमानोरा क्लब) वि.वि. अभिजीत रानाडे (डेक्कन जिमखाना) ९-६;
तन्मय जातकर (ब्रेक द स्नुकर) वि.वि. धवल गढवी (क्यु क्लब) ९-६;

अंतिम सामनाः शिवम अरोरा (अमानोरा क्लब) वि.वि. तन्मय जातकर (ब्रेक द स्नुकर) १०-७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button