कै. कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृतिदिनानिमित्त आंतर शालेय क्रॉसकंट्री २०२५ स्पर्धा !!
शुभंकर पांढरे, मृगया जरांडे, शंभुराजे बाणखेले, आदिती भाड, सागर सजगाने, आर्या डोके यांचा प्रथम क्रमांक !!

पुणे, २७ जुलैः महाराष्ट्रीय मंडळाच्या शेठ दगडुराम कटारिया हायस्कूल तर्फे आयोजित कै. कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृतिदिनानिमित्त आंतर शालेय क्रॉसकंट्री २०२५ स्पर्धेत शुभंकर पांढरे, मृगया जरांडे, शंभुराजे बाणखेले, आदिती भाड, सागर सजागाने आणि आर्या डोके यांनी आपापल्या गटामध्ये अव्वल वेळ नोंदवित प्रथम क्रमांक पटकाविला.
मुकूंटदगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रबंधक रामचंद्र रागिरी अंचल प्रबंधक, पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पुणे प्रणिता कुमावत नाईक उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद पुणे, श्री अभय छाजेड पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले आणि एस.डी. कटारिया हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय शेंडगे यांच्या उपस्थित करण्यात आले. स्पर्धेत पुणे आणि जिल्ह्यातील नामांकित ७५ शाळांमधील सुमारे ११८० खेळाडू विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. काल आणि आज झालेल्या पावसामुळे स्पर्धा मार्गावर प्रचंड प्रमाणावर चिखल असल्याने मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्पर्धेचे अंतर कमी करण्यात आले. ११ वर्षाखालील गटासाठी ६०० मीटर तर, १३ आणि १५ वर्षाखालील गटासाठी १ किलोमीटर अंतराची शर्यत ठेवण्यात आली होती.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण मीना मित्तल ब्रांच मॅनेजर टी. म. वी. शाखा बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रीय मंडळाच्या शैक्षणिक संचालिका नेहा दामले , श्री भगवान परदेशी, मार्केटिंग व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, श्री भास्कर भोसले छत्रपती पुरस्कार विजेते, श्री संजय नाईक राष्ट्रीय खेळाडू, श्री सौरभ रायकर सामाजिक कार्यकर्ते, आंतरराष्ट्रीय पंच श्री किशोर शिंदे, श्री शशी लांडगे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध सहभागी शाळेतील शिक्षक, प्रशिक्षक आणि पालक उपस्थित होते. विजेत्यांना एक लाख रुपयाची बक्षिसे, पदके प्रमाणपत्रे आणि स्पोर्ट्स बॅग्ज् प्रदान करण्यात आला. यासाठी चॅम्पियन्स स्पोर्ट्स यांनी सुद्धा प्रायोजकत्व दिले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.डी. कटारीया हायस्कूलचे मनोज पवार यांनी तर, स्पर्धेसाठी आलेल्या सर्वांचे आभार समन्वयक क्रीडाशिक्षक हर्षल निकम यांनी मानले.
स्पर्धेचा सविस्तर निकालः (नाव, शाळेचे नाव आणि वेळ या क्रमानुसार)ः
१५ वर्षांखालील मुले (१ किमी):
१ सागर सजगाने (राधाकृष्ण माध्यमिक विद्यालय, ४:१२:५६);
२ धियान पेरला (बिशप्स के.एल एन ४:१३:३५);
३ संग्राम लोंढे (महात्मा गांधी शाळा, ४:२८:११);
४ प्रतीक आव्हाळे (प्रॉडिजी पब्लिक स्कूल, ४:२८:४४);
५ आदिल सय्यद (एस.डी कटारिया हायस्कूल , ४:३०:०४);
६ नबीन सौद (एस.डी कटारिया हायस्कूल , ४:३१:४२);
७ रुद्र मोलावडे (मारइवेनियस कॉन्व्हेंट स्कूल, ४:३५:१८);
८ करण यादव (एच.ए हायस्कूल पिंपरी, ४:३५:०९);
९ अर्णव पवार (डी.ई.एस माध्यमिक शाळा, ४:३५:४१);
१५ वर्षांखालील मुली (१ किमी):
१ आर्या डोके (न्यू न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी, ४:३३:२६);
२ चार्वी गायकवाड (माउंट कारमेल हायस्कूल, ५:०९:०७);
३ साई कराळे (सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, ५:११:१७);
४ गायत्री केंद्रे (समता विद्यालय, ५:११:४५);
५ तन्वी वर्पे (बी.जे.एस. शाळा, ५:१४:२९);
६ सायली गरळे (समता विद्यालय, ५:२१:०९);
७ पूर्वी गायकवाड (समता विद्यालय, ५:२४:५४);
८ आयुषका आव्हाळे (जे.एस.पी.एम स्कूल, ५:२७:००);
९ सोनम चौधरी (महाराष्ट्रीय मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल, ५:३७:४८);
१३ वर्षांखालील मुले (१ किमी):
१ शंभुराजे बाणखेले (न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी, ४:२४:३२);
२ स्वराज खामकर (एस.पी.एम स्कूल, ४:२४:२०);
३ चिरंजीव परदेशी (महाराष्ट्र मंडळ इंग्लिश मीडियम टिळक रोड, ४:४०:७९);
४ यश चंदनकर (समता विद्यालय, ४:५२:२५);
५ आर्यन पाबाळे (न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी ४:५५:२१)
६ साई थोरात (न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी ४:५६:५९);
७ कार्तिक तांबे (ज्ञानाअंकुर इंग्लिश स्कूल, ४:५८:२२);
८ वेदांत रेणुसे (मुक्तांगण इंग्लिश स्कूल, ४:५९:३०);
९ मयंक ढेरंगे (न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी, ५:०३:०८);
१३ वर्षांखालील मुली (१ किमी):
१ आदिती भाड (बी.जे. एस. वाघोली, ४:४१:३२);
२ प्रतीक्षा मोरे (समता विद्यालय, ४:५३:२७);
३ रितू शिंदे (समता विद्यालय, ४:५६:३१);
४ आराध्या गायकवाड (अहिल्या देवी हायस्कूल, ४:५७:०३);
५ केसर पुजारी ( अँचिवर्स स्कूल, ४:५७:३३);
६ श्रुष्टी पोमन (समता विद्यालय, ५:००:३५);
७ इच्छा जाधव (न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी, ५:१५:०५);
८ हर्षदा भिडे (डी.ई.एस. हायस्कूल, ५:३२:३०);
९ मोनी साळुंखे (समता विद्यालय, ५:३३:२३);
११ वर्षांखालील मुले (६०० मी):
१ शुभंकर पांढरे (महाराष्ट्रीय मंडळ टिळक रोड, १:२३:२७);
२ वरद भोर (बी.जे.एस. वाघोली, १:२४:१०);
३ सेवांश कापरे (मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, १:२४:३०);
४ समीर शेख (वाय. सी. एम. सर जॉर्ज विल्यम हायस्कूल, १:२४:३०);
५ जतिन सिंग (आर्मी पब्लिक स्कूल, १:२६:२७);
६ अयानअली शेख (मोलेदिना हायस्कूल, ०१:२६:९९);
७ सर्वज्ञ खान्देशी (जिल्हा परिषद शाळा, पिंपळ गाव, १:२८:५८);
८ अर्चित अळवाणी (डी.ई.एस, १:२९:५८);
९ सम्राट मनवर ( मुक्तांगण स्कूल, १:३०:१३);
११ वर्षांखालील मुली (६०० मी):
१ मृगया जरांडे (नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल, १:२०:२९);
२ आरोही उत्तेकर (माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, १:२१:३२);
३ रक्षिता राठोड (मूनलाईट पब्लिक स्कूल, १:२१:२२);
४ आरोही आव्हाळे (बी.जे.एस. वाघोली, १:२७:१२);
५ सृष्टी जाधव (एस.पी.एम. शाळा, १:३२:१७);
६ अक्षरा पांगारे (सरहद हायस्कूल, १:३२:१७);
७ आरोही गारगोटे (एस. पी. एम. शाळा, १:३२:४८);
८ काव्या कोल्हटकर (डी.ई.एस. स्कूल, १:३३:५९);
९ आनंदी तिरुके (राधाकृष्ण विद्यालय, १:३४:१५);