आलंदीमराठी

आळंदी ग्रामीण रुग्णालयास शासनाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर

आळंदीत डॉ. उर्मिला शिंदे यांचा सत्कार उत्साहात एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अंतर्गत कायाकल्प प्रकल्प राबविला जातो. या उपक्रमा अंतर्गत पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आळंदी ग्रामीण रुग्णालय यांना शासनाचा कायाकल्प कार्यक्रमांतर्गत सन २०२४ – २५ या वर्षातील सर्वोत्कृष्ट रुग्णसेवा, स्वच्छता व व्यवस्थापना करीता रुपये १ लाख रक्कमेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार आळंदी ग्रामीण रुग्णालयाने सलग दुसर्‍या वर्षी ही आपल्या कडेच ठेवण्यात यश मिळवले आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयाने हा पुरस्कार दुस-यांदा मिळविल्याने येथील आरोग्य सेवेच्या कार्याचे आळंदी पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे. आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे रुग्णालयात सत्कार उत्साहात करण्यात आला.
आळंदी ग्रामीण रुग्णालयास कायाकल्प प्रकल्प पुरस्कार जाहीर झाल्याने आळंदीचे आरोग्य सेवेच्या वैभवात वाढ झाली आहे. या निमित्त आळंदी पंचक्रोशीचे वतीने आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांचे हस्ते सत्कार करून रुग्णालयाचे कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा प्रतिनिधी सुहास सावंत यांचेसह रुग्णालय कर्मचारी, सेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
आळंदी ग्रामीण रुग्णालयाने मिळविलेला हा पुरस्कार पुणे मंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डाॅ.राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय पुणे डाॅ.नागनाथ यमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ उर्मिला शिंदे, वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून प्राप्त झाल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.उर्मिला शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button