फेडरल बँक पुणे व्दितीय मॅरेथॉनचे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजन
मिलिंद सोमण पुण्याच्या सिग्नेचर मॅरेथॉन स्पर्धेचा चेहरा

पुणे, ४ ऑगस्ट २०२५: बहुप्रतिक्षित फेडरल बँक पुणे मॅरेथॉनाचा व्दितीय आविष्कार रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणेकरांच्या भेटीसाठी पुन्हा येत आहे. भारताच्या वाढत्या फिटनेस नकाशावर पुण्याने या मॅरेथॉनच्या माध्यमातून आता आपले स्थान पक्के केले आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे धावपटू या मॅरेथॉनसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाइट https://stridersevents.in/events/info?FederalBankPuneMarathon2025= द्वारे आपली ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण हे फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचा चेहरा असणार आहेत. या मॅरेथॉनद्वारे सर्व वयोगटातील व्यक्तींना आरोग्य, चिकाटी आणि समावेशक सहभागासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे. स्पर्धेचा प्रारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत विविध शर्यतींच्या गटांसाठी एकूण ११ लाख रूपयांची बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. मॅरेथॉनची नावनोंदणी आता सुरू झाली असून प्रवेश शुल्क खालीलप्रमाणे आहे:
- मॅरेथॉन (42.2 किमी): 950 रुपये + जीएसटी
- अर्ध मॅरेथॉन (21.1 किमी): 900 रुपये + जीएसटी
- 10 किमी शर्यत: 750 रुपये + जीएसटी
- 5 किमी शर्यत: 600 रुपये + जीएसटी
या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या गणवेशधारी सेवेतील जवानांना मानवंदना म्हणून, लष्करी जवान तसेच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी नोंदणीशुल्क आकारले जाणार नाही.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत आयोजित फेडरल बँक पुणे मॅरेथॉन ही भारतातील सर्वाधिक सर्वसमावेशक मॅरेथॉनपैकी एक आहे. या मॅरेथॉनमध्ये इतरांसोबत धावण्यासाठी विशेष क्षमता असलेल्या सहभागींचे स्वागत करण्यात येत आहे. या आगळ्यावेगळ्या मोहिमेचे नेतृत्व मिलिंद सोमण करतील. या स्पर्धेच्या ४२.२ किमी मॅरेथॉन, २१.१ किमी हाफ मॅरेथॉन आणि इतर शर्यती या तीन मुख्य गटांमध्ये ३००० हून अधिक धावपटू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पूर्ण किंवा अर्ध मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या धावपटूंना त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी फिनिशर पदकाने सन्मानित केले जाणार आहे आणि या पदकाच्या रुपाने या मॅरेथॉनच्या स्मृती कायम त्यांच्या मनात दरवळत राहतील.
फेडरल बँकेचे सीएमओ एम व्ही एस मूर्ती म्हणाले, “आर्थिक असो अथवा शारीरिक प्रवास असो, अशा उद्देशपूर्ण प्रवासाला अधिकाधिक शक्ती प्रदान करणे, ही फेडरल बँकेची कायम धारणा राहिलेली आहे. धावणे हे जीवनाचे एक गमक आहे. ते तयारी, चिकाटी आणि उत्कटता या गुणांना नेहमीच बक्षीस देते. फेडरल बँक पुणे मॅरेथॉनमध्ये या तिन्ही गुणांचा समावेश आहे, परंतु त्याला असल्ल पुणेरी भावनेची जोड मिळालेली आहे. मिलिंद सोमण या उपक्रमाचा एक चेहरा म्हणून सर्वांसमोर प्रतिनिधीत्व करत असल्याने, २३ नोव्हेंबर रोजी होणारी ही व्दितीय मॅरेथॉन आणखी मनोरंजक बनणार आहे. शब्दशः तसेच जीवनाचे एक रुप अशा दृष्टीने प्रेरित करणाऱ्या कारणासाठी एकत्र येण्यास आम्हाला हा उपक्रम पुन्हापुन्हा प्रेरणा देत आहे.”
स्ट्रायडर्सचे संचालक प्रफुल्ल उचील (Uchil) म्हणाले, “गेल्या वर्षी या उपक्रमाच्या पहिल्या आवृत्तीला आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ सहभागी व्यक्तींची संख्याच नव्हे तर ऊर्जा, उत्साह आणि पुणे शहर सज्ज आहे, हा विश्वास केवळ शर्यतीसाठी नव्हे तर एका उपक्रमाला बळकट करण्यासाठी असल्याचे यातून दिसून आले. हाच विश्वास आपल्याला या वर्षी अधिक महत्त्वाकांक्षा, अधिक व्यापक प्रमाणात आणि उद्देशाच्या मजबूत भावनेसह परत एकत्र आणत आहे.
५ किमी फन रन, १० किमी, २१ किमी हाफ मॅरेथॉन आणि ४२ किमी फुल मॅरेथॉन आता खुली झाली आहे. प्रत्येक गट हा एक उत्सव, जल्लोष आहे. तुम्ही पहिल्यांदाच धावणारे असाल किंवा अनुभवी मॅरेथॉनपटू असाल, हा उपक्रम तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी, गुंतवून ठेवण्यासाठी आणि तुमची क्षमता उंचावण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे.”
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी मिलिंद सोमणचा विशेष संदेश, “तुम्ही धावत असलेले प्रत्येक पाऊल एक गोष्ट तुम्हाला सांगते आणि ती म्हणजे ताकद, लवचिकता आणि मर्यादा ओलांडण्याची तुमच्यात इच्छाशक्ती आहे. फेडरल बँक पुणे मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नाही; ती एक अशी यात्रा आहे, जी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय घेतल्यापासून सुरू झालेली आहे. तुम्ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसाठी आसुसलेले असाल किंवा फक्त स्वतः हे ध्येय गाठू शकतात, हे सिद्ध करत असाल तर तो तुमच्यासाठी एक अनमोल क्षण ठरणार आहे. मी तुमच्यासोबत फक्त धावण्यासाठी नव्हे तर, हजारो व्यक्तींना त्यांच्या धैर्याच्या आणि वैभवाच्या कथा साकारताना पाहण्यासाठी उपस्थित असेन. मॅरेथ़ॉनच्या आरंभबिंदूपाशी आपण सारे भेटूया.”